Type Here to Get Search Results !

पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत कर्जतची अमृता भगतला सुवर्ण पदक..

 

 कर्जत प्रतिनिधी ; महाराष्ट्र राज्य पावर लिफ्टिंग असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरीय आणि मास्तर पावर लिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन कर्जत येथील कोकण ज्ञानपीठ महाविद्यालय येथे करण्यात आले होते.

         कर्जत तालुक्यातील अमृता भगत हिने ४७ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले आहे. जगातील पॉवर लिफ्टिंग स्पर्धेची अमृता ही उपविजेती बंदी आहे. पुरुष व महिला अशा दोन गटात आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत अमृता ही आकर्षण ठरली आहे. कर्जत तालुक्यातील शेलु येथील रहिवाशी असलेली अमृता ज्ञानेश्वर भगत हिने सुवर्णपदक पटकावले आहे ही स्पर्धा राज्य पावर लिफ्टिंग असोसिएशनच्या वतीने कर्जत येथे भरवण्यात आली होती. अमृता ही जगातील पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत उपविजेती ठरलेली आहे. त्यामुळे अमृता भगत ही अशी कामगिरी पाहता तालुक्यात सर्वत्र ठिकाणी तिचे कौतुक आणि तीच अभिनंदन केले जात आहे. 

Post a Comment

0 Comments