मुंबई.. भारत जोडो न्याय यात्रेचा समारोपण दादरच्या चैत्यभूमीवर झाला. सुरुवातीला केवळ बाबासाहेबांच्या अभिवादना पुरता मर्यादित असलेल्या या कार्यक्रमात दोन गोष्टींचा समावेश करण्यात आला. या निमित्ताने देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व त्यांचे पणतू आणि पहिले कायदेमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर व राहुल गांधी एकत्र येण्याचा योग घडून आला.
राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप दादर येथील चैत्यभूमीवर झाला. चैत्यभूमीवर केवळ अभिवादनाचाच कार्यक्रम घेण्यास ट्रस्ट ने परवानगी दिली होती. परंतु सहा हजार किलोमीटरच्या यात्रेचा शेवट काही मिनिटातच करणे यात्रेच्या आयोजकांना योग्य वाटत नव्हते,प्रथम संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन केले, अखेर हत्ती अंबिरे यांनी ट्रस्टला पटवून दिले असल्यामुळे संविधान वाचन आणि राहुल गांधींचे भाषण चैत्यभूमीवर तीस ते पस्तीस मिनि टांचा कार्यक्रम पार पडला.
नातू भिमराव आंबेडकर हे १५ व १६ मार्च ते धार्मिक कार्यक्रमात निमित्त लखनऊच्या दौऱ्यावर गेले होते. त्यामुळे चैत्यभूमीवर उपस्थित राहण्याची विनंती हत्ती अंबिरे यांनी त्यांना केली. याचा मान ठेवून भीमराव आंबेडकर 16 मार्चला मुंबईत परतले. राहुल गांधी चैत्यभूमीवर दाखल झाल्यानंतर त्यांचे स्वागत भीमराव आंबेडकर यांनी केले. यावेळी समता सैनिक दलाच्या तर्फे राहुल गांधींना मानवंदना देण्यात आली. या नियोजनाची जबाबदारी काँग्रेसच्या अनुसूचित विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्ती आंबिरे यांच्याकडे सोपविण्यात आली होती. चैत्यभूमी वरील कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हत्ती आंबिरेच्या नेतृत्वात मुंबई काँग्रेसची एक टीम तीन दिवस काम करत होती.
जे लोक देशाची लोकशाही, बाबासाहेबांनी दिलेले संविधान वाचवण्यासाठी काम करत आहेत त्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आमचे धोरण आहे.((आनंद राव आंबेडकर बाबासाहेबांचे नातू).. जवाहरलाल नेहरू व बाबासाहेबांचे वारस एकत्र आले . चैत्यभूमी सारख्या पवित्र भूमीवर...


Post a Comment
0 Comments