प्रतिनिधी कर्जत (प्रफुल जाधव); कर्जत तालुक्यातील कडाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रा मध्ये तेथील आदिवासी वाडीतील महिला गरोदर महिला बाळंतपणासाठी रायगड हॉस्पिटल मध्ये दाखल झाली. अनुसया मिरकुटे असे या महिलेचे नाव. कडाव प्राथमिक आरोग्य केंद्रा मध्ये दाखल झाल्यावर त्यांचे वजन ३४ किलो होते तर बाळाचे वजन एक किलो ४०० ग्राम इतके होते. अतिशय छोटे बाळ असताना अनुसया मिरकुटे यांना प्राथमिक आरोग्य केंद्राने आपल्या बाळाला घेऊन पुढील उपचारासाठी मुंबई मधील वडीया रुग्णालयात नेण्याची सुचना केली. मला तेथे योग्य उपचार होईल की नाही याची भीती मनात होती.आणि याच माहितीनुसार त्यांनी डिकसल येथील रायगड हॉस्पिटल येथे धाव घेतली.
जिल्ह्यातील गरीब रुग्णांसाठी हक्काचे ठिकाण म्हणजे रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर म्हणून ओळख. त्या प्रमाणे आई आणि बाळाला हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. त्या वेळी अनुसया यांच्या शरीरातील हिमोग्लोबिन खालावले होते. हे डॉक्टरांच्या लक्षात येताच डॉक्टरांनी माता आणि बालकावर उपचार सुरू केले. रायगड हॉस्पिटल चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हुब्बु जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ हर्षल यांनी अनुसया मिरकुटे यांच्यावर व वजन कमी असलेल्या बाळावर यशस्वी उपचार केले.
अनुसया मिरकुटे यांची आवस्था लक्षात घेऊन डॉक्टरांनी त्वरित दक्षता विभागात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू केले. अनुसया मिरकुटे व वजन कमी असलेले बाळ यांवर यशस्वी उपचार केले. अनुसया मिरकुटे या तब्बल ३७ दिवस उपचार घेऊन आपल्या घरी सुखरूप जाऊ शकल्या. मात्र आर्थिक परस्तीथी नसल्याने अनुसया मिरकुटे यांनी रायगड हॉस्पिटल मध्ये उपचार घेण्याचा निर्णय घेतला त्यामूळ आई सह बाळाला देखील वाचवण्यात आले.....

Post a Comment
0 Comments