कर्जत ; (मुख्य संपादक श्री ज्ञानेश्वर साळोखे) ; काळ तू होतीस म्हणून आज आम्ही आहोत माई.. नाहीतर आम्हाला स्वयंपाक घर न्हाणीघर, देवघर या पलीकडे अस्तित्वच नव्हते.
तू उंबरठा ओलांडला नसता तर, आम्ही आजही उंबरठ्यावर आडच राहिलो असतो. खिडकीतून दिसणार्या टीचभर आभाळात नशिबातील पौर्णिमा आमावश्या बघत बसलो असतो.
तू खाल्ल्या शिव्या- शाप म्हणून आम्ही आज "आशीर्वाद" जागतो आहोत. तुझ्या अंगावर फेकले होते शेण, दगड आणि माती,पण अक्षर ओळखीने आज आम्ही स्वर्गात नांदतो आहोत.
तुझा लढा आमच्या साठीचा काळ इतिहास सांगून गेला. आज वर्तमानात तुझ्या लेकी , माई भविष्य घडवत आहेत. तुझ्या आजन्म वृणी तुझ्या लेकी आज तुझ्या मार्गावर चालत आहेत.
क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...

Post a Comment
0 Comments