कर्जत... कार्यकारी संपादक (रतन लोंगळे) ; कर्जत तालुक्यातील राष्ट्रवादी अजित दादा पवार गट तालुका जनसंपर्क कार्यालय कर्जत येथे हजारोंच्या संख्येने उपस्थित कार्यकर्ते तसेच नवीन नियुक्त पदाधिकारी यांच्या आज माजी रायगड जिल्हा उपाध्यक्ष श्री सुधाकर घारे साहेबांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करण्यात आले.
शिवसेनेचे (शिंदे गट) प्रवक्ते अमोल पाटील, यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून आठ दिवसही उलटले नसताना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे यांनी शिंदे गटाला पुन्हा मोठा झटका दिला आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या खोपोली च्या नेत्या सौ.सुरेखा खेडकर यांनी आज रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री सुधाकर भाऊ घारे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
सौ.सुरेखा खेडकर यांची आक्रमक महिला नेत्या अशी ओळख होती. महिलांचे प्रश्न, काही समस्या आणि अडचणींना सामोरे जाण्याची एक धमक त्यांच्या दिसून येते होती... आज त्यांनी कर्जत येथील जनसंपर्क कार्यालयात आपल्या असंख्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष प्रवेश केला आहे... यावेळी ज्येष्ठ पत्रकार बाबू पोटे, एडवोकेट अनोल पाटील, पत्रकार प्रशांत गोपाळे, यांच्या पुढाकारातून हा पक्ष प्रवेश करण्यात आला . यावेळी खालापूर तालुका व खोलीतील पदाधिकारी उपस्थित होते.....


Post a Comment
0 Comments