प्रतिनिधी कर्जत ( प्रफुल जाधव); कर्जत शहराचे तडपदर नेतृत्व कृष्णा जाधव यांचा आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश झाला...
तडपदार नेतृत्व, नागरिकांच्या समस्या,समाजातील सगळ्यांच्या सुख दुःखात सहभागी होणारे व युवकांचे एक चांगले मित्र आणि आधारस्तंभ त्याच प्रमाणे कर्जत नगरपालिकेच्या हद्दीतील ज्येष्ठांना, महिलांना मदत, त्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम त्यांनी कर्जत संघर्ष समिती च्या माध्यमातून करत आले. त्याच प्रमाणे रुग्णालयातील वैद्यकीय समस्या असतील रुग्णांना मदत या साठी ते हमेशा तत्पर. चांगलं कार्य, व्यक्ती महत्त्व त्यांची ओळख, त्यांनी त्यांच्या या प्रामाणिक कार्यातून खूपच चांगली कार्य केले आहेत,.
कर्जत येथील शिवालय शिवसेना मध्यवर्ती कार्यालय मध्ये कृष्णा जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांचा पक्ष प्रवेश करण्यात आला. यावेळी कृष्णा जाधव, प्रणयजी भोजने, युवा नेते वैभव भोईर, आकाश भाई रोकडे, व अन्य कार्यकर्त्यांनी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी ठाकरे गटाचे भावी खासदार संजोग वागैरे पाटील व कर्जत खालापूर मतदार संघाचे भावी आमदार उपजिल्हा अध्यक्ष नितीन दादा सावंत, यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष प्रवेश करण्यात आला. कर्जत शहर सह संपर्क प्रमुख विनोद पांडे. कृष्णा जाधव कर्जत शहर उपप्रमुख, युवा सेना कर्जत शहर सचिव पदी प्रणयजी भोजने यांची निवड करण्यात आली....

Post a Comment
0 Comments