कर्जत.( प्रफुल जाधव); अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद पोलिस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली. यांच्या विद्यमाने ५ मार्च मंगळवार रोजी. संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री किशोर शितोळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तालुक्यात विविध ठिकाणी समाज कार्यक्रम राबविण्यात आले,.
रायगड जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात संघटनेचे कार्य जोराने चालू आहे, दर वर्षी प्रमाणे याही वर्षी संघटनेच्या माध्यमातून समाजात उल्लेखनीय कार्य, समाज कार्य केलेल्या मान्यवरांचा या वेळी सन्मान करून, वाढदिवसाच्या निमित्ताने मतिमंद मुलांची निवासी शाळा चींचवली येथील मुलांना अल्पोऊपहार देण्यात आले,तसेच वाढदिवसाच्या निमित्ताने "समाज भूषण" २०२४ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी , समाज प्रबोधन करणारे हरिभक्त पारायण, वासुदेव बडेकर महाराज, मतिमंद मुलांची निवासी शाळा संस्थापक, श्री संदीप जेठे सर, श्री जनार्दन म्हात्रे, भजन संगीत श्री सचिन लोंगळे, ज्येष्ठ पत्रकार पवार साहेब, ज्येष्ठ भजनी कलाकार श्री संतोष दळवी, डॉ. विशाल बनसोडे डोळे स्पेशालिस्ट, इत्यादी यांना समाज भूषण पुरस्कार २०२४ ने सन्मानित करण्यात आले.
या वेळी संघटनेचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर सालोखे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री किशोर शितोळे, प्रदेश कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगले, प्रदेश युवक अध्यक्ष श्री सुप्रेश सालोखे, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष प्रफुल जाधव, रायगड जिल्हा सदस्य सुभाष ठाणगे,कर्जत तालुका युवा अध्यक्ष सुरज चव्हाण, तालुका महासचिव रुपेश कदम, यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले..

Post a Comment
0 Comments