Type Here to Get Search Results !

अल्पवयीन मुलीचा विनयभंग पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल.

 कर्जत..(रतन लोंगळे);    कर्जत तालुक्यातील एका फार्म हाऊस वर अल्पवयीन मुलीला घेऊन जाऊन तिचा विनयभंग केल्याची घटना कर्जत तालुक्यात घडली आहे याबाबत बेकरे गावातील आरोपीवर पोस्को अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

          ती मुलगी अल्पवयीन आहे हे माहित असून देखील तिचा विनयभंग करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 25 फेब्रुवारी दुपारच्या सुमारास वृंदावन फार्म हाऊस सावेले येथे संशयित आरोपी कराले याने पीडित बालिका हिला एका खोलीत नेले ती अल्पवयीन आहे हे माहित असून देखील तिच्याशी असभ्य वर्तनुक करत तिचा विनयभंग केला. पीडित बालीकेने याबाबत सर्व माहिती घरी सांगितल्यावर घरच्यांनी थेट कर्जत पोलीस स्टेशन गाठलं व याबाबत तक्रार दाखल केली आहे.

याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला. गु. र न.५९/३०२४ भा. द. वी. क.३५४/३५४ ब. बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संगीता गावडे करीत आहेत.









Post a Comment

0 Comments