कर्जत.( प्रतिनिधी -प्रफुल जाधव) ; ५ मार्च रोजी मंगळवार, हिंद. पोलिस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली व अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया यांच्या विद्यमाने महाराष्ट्र प्रदेश अंतर्गत समाज भूषण पुरस्कार २०२४ चे वितरण करण्यात आले.
या पुरस्कार करण्याच्या मागील विशेष हेतू म्हणजे समज्यात तळागाळात समाज सेवा, करणारे, प्रबोधन कार, भजन संगीत, डॉक्टर, कलाकार, प्रवचन, कीर्तन,आख्यान, यांसारख्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दर वर्षी प्रमाणे या वर्षी देखील ५ मार्च" समाज भूषण २०२४"पुरस्काराचे आयोजन करण्यात आले, आपल्या वाणीतून समाज प्रबोधन, प्रवचन कीर्तन करून मार्गदर्शन करणारे, हरिभक्त पारायण महाराज श्री वासुदेव बडेकर, भजन संगीत अनेक वर्षे सेवा,आणि समाज सेवा करणारे व्यक्ती म्हणून ओळख आणि आपल्या भजनी सेवा मध्ये तत्पर असणारे श्री सचिन लोंगळे, उत्कृष्ट संगीत कला श्री जनार्दन म्हात्रे (रोहा), संतोष दळवी कला भजन, संगीत, डॉ. विशाल बनसोडे चांगले मार्गदर्शक व स्पेशालिस्ट, अनेक सरकारी, निमसरकारी, शाळा, कॉलेज मध्ये मोफत आरोग्य शिबीरे. त्याच प्रमाणे पत्रकार पवार साहेब, त्याच प्रमाणे मतिमंद मुलांची शाळा संस्थापक दिलीप जेठे, यान सर्व विशेष समाज कार्य, समाज सेवा करणाऱ्यांना हिंद.. पोलिस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली, "समाज भूषण पुरस्कार २०२४"ने सन्मानित करण्यात आले.
या वेळी हिंद.. पोलिस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली व अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया चे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री किशोर शितोळे, प्रदेश कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगळे, ज्येष्ठ सल्लागार श्री उत्तम ठोंबरे, प्रदेश युवक अध्यक्ष श्री सुप्रेश साळोखे, रायगड जिल्हा युवा अध्यक्ष कु प्रफुल जाधव, जिल्हा सदस्य सुभाष ठानगे, तालुका युवा अध्यक्ष सूरज चव्हाण, महा सचिव रुपेश कदम, यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण करण्यात आले...
Post a Comment
0 Comments