Type Here to Get Search Results !

कर्जत भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांची मनमानी, दलालांना त्वरित दाखल्याचे वाटप.

 

कर्जत प्रतिनिधी (सूरज चव्हाण) ; कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचे दाखले मिळविण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयात जावे लागते. तर दुसरी कडे तेथे दलाल मंडळींकडून कर्मचारी शेतकऱ्यांना दाखले देण्यासाठी त्यांची रखडपट्टी करतात.

           अनेक वेळा येथील अधिकारी यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई करण्यात आली असून, देखील तेथील कर्मचारी याच्यात सुधारणा होत नसताना दिसत आहे. पूर्वी याच कार्यालयातील कर्मचारी टाचणी ने टोचून नकाशे बनऊन शेतकऱ्यांना वेळेत द्यायचे, आता सर्व नकाशे स्कॅन केले आहेत, फक्त क्लिक करून झेरॉक्स सेंटर मध्ये पाठवायचे असतात असे असतानाही तेथील काही कर्मचारी हे सर्वसामान्य शेतकऱ्यांची अडवणूक करत आहेत. एका कामासाठी शेतकऱ्यांना तीन ते चार फेऱ्या माराव्या लागतात. जमिनीची मोजणी केलेला नकाशा किमान एक महिन्यांनी सुद्धा मिळत नाही.

            कार्यालयाच्या शेजारीच कर्जत पोलिस ठाणे आणि पोलिस उपअधीक्षक यांचे कार्यालय असताना देखील तेथील कर्मचारी व कामगार यांना कश्यचीच भीती नाही. कर्जत भूमी अभिलेख विभागाचे उपनिरीक्षक यांच्या कडे कोणतीही तक्रार करून देखील काहीच त्याचा उपयोग होत नाही.असे अनेक शेतकरी वर्गाचे म्हणणे आहे. तर कर्जत तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात डोंगर व आदिवासी वाड्या वस्त्यांवरील नागरिक आपल्या जमिनीच्या मोजणी संदर्भात नकाशा ,गडबुक नकाशा आदी प्रकारच्या महत्त्वाच्या कामासंदर्भात भूमी अभिलेख विभागात वारंवार येत असतो तरी कोणतेही काम केलेत होत नसल्याने शेतकरी व ग्रामस्थ यांच्यात संतापाचीची लाट पसरली. आहे

Post a Comment

0 Comments