अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया. नवी दिल्ली. या संघटनेच्या प्रदेश अध्यक्ष पदी काम करत असताना अनेक विषयी त्यांनी, समाजातील नागरिकांच्या समस्या, रोजगार, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न, यावर वारंवार वाचा फोडणारे,आणि आपल्या संघटनेच्या माध्यमातून गावागावात, आदिवासी भागात काम करत नागरिकांच्या मनात बसलेळे व्यक्ती म्हणून ओळख होते ती प्रदेश अध्यक्ष किशोर शितोळे यांची.
समाजात अनेक सामाजिक उपक्रम संघटनेच्या माध्यमातून राबविण्यात येत असून, त्यातच आता येणाऱ्या ५ मार्च रोजी यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे आणि त्या प्रसंगी समाजातील विविध भागात कार्य करणारे समाज सेवक, प्रवचन कार, पत्रकार, भजनी कलाकार, डॉक्टर, यांना समाज भूषण पुरस्कार देण्यात येईल. गेली अनेक वर्षापासून पुरस्काराचे आयोजन केले जात आहे. समाजात समाज कार्य करीत असलेल्यांना प्रोत्साहन मिळाले तर नक्कीच काहीतरी वेगळं होईल, याची जाणीव करून दिली. येणाऱ्या ५ मार्च रोजी शितोळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने समाज भूषण २०२४ पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे...
तरी समाजातील समाज सेवक, संघटनेच्या कर्जत तालुका कमिटी पदाधिकारी यांनी आपली उपस्थिती अनिवार्य आहे..

Post a Comment
0 Comments