नेरळ माथेरान; (गोविंद सांबरी) ; माथेरान डोंगराच्या कुशीत अनेक ठिकाणी आदिवासी बांधवांच्या वाड्या वस्त्या वसलेले आहेत. यामध्ये गेली अनेक वर्ष त्यांची रस्त्याची मागणी आहे मात्र त्यांना त्यांच्या हक्काचा रस्ता मिळत नसल्याने आज आदिवासी बांधवांच्या सहनशीलतेचा बांध फुटला खुद्द राज्याच्या मुख्यमंत्री यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन झालेल्या रस्त्यात वन विभागाची अडचण निर्माण झाल्याने रस्ता पुन्हा लाल फीतीत अडकला.
माथेरानच्या कुशीत वसलेल्या १२ वाड्यांच्या आदिवासी समाजाने आज रस्त्यावर उतरून नेरल माथेरान घाटात रस्ता रोको आंदोलन केले आहे त्यामुळे त्या रोडवरती वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. जवळपास यामध्ये जुम्मा पट्टी धनगरवाडा बेकरेवाडी अस्सलवाडी नाण्याचा माळ नाने माल, पर्यंतचा सुमारे १२ आदिवासी वाड्या आहेत.
रस्ता रोको आंदोलनामुळे वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांनी आंदोलन ग्रामस्थांशी चर्चा करत आंदोलन मागे येण्याची विनंती केली. साधारण तासाभरानंतर वाहनांसाठी रस्ता मोकळा झाला.
आदिवासी बांधव शासनावर अवलंबून न राहता श्रमदान करून तेथील रस्ता स्वतः तयार करतात. रस्त्याला वन विभागाची अडचण येत असल्याने दरवर्षी तेथील रस्ता हा लोक कच्च्या स्वरूपात श्रमदानातून बनवत असतात. रस्ता नसल्यामुळे तेथील आदिवासी वाढतील एखादा व्यक्ती आजारी पडल्यास व गरोदर स्त्रिया यांना रुग्णालयात नेताना बांबूची डोली करून रात्री अपरात्री पाच ते सहा किलोमीटर अंतरावरती जुमापट्टी या ठिकाणी आणून मग नेरळ किंवा कर्जत या शहरा ठिकाणी उपचारासाठी न्यावे लागते यासाठी आदिवासी बांधवांना मोठा संघर्ष करावा लागतो.
कर्जत येथे सात जानेवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा प्रसंगी आले असताना त्यांच्या हस्ते किरवली बेकरेवाडी रस्त्याचे ऑनलाईन भूमिपूजन झाले परंतु वन विभागाची अडचण निर्माण झाल्याने पुन्हा काम लाल फितीत अडकले.
त्यामुळे संपूर्ण आदिवासी समाज आक्रमक झाला आहे. "मात्र रस्ता मिळाला नाही तर नेरल माथेरान घाटात रस्त्यावर संसार मांडू" असा इशारा या वेली ग्रामस्थांनी दिला. यावेळी आदिवासी समाजाचे कार्यकर्ते जयतु पारधी, गणेश पारधी ,आदिवासी संघटनेचे तालुकाध्यक्ष पांडुरंग दरोडा ,दत्तात्रय निरगुडा ,माथेरान माजी नगरसेविका रूपाली आखाडे, नेरळ सदस्य संतोष शिंगाडे ,सुनील पारधी, माजी सरपंच माणगाव कल्पना पारधी जयेंद्र कार्यालय अनेक मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते..


Post a Comment
0 Comments