कर्जत (मोतीराम पाटील) ; आदिवासी ठाकूर समाज संघटनेची स्थापना सन १९८५ मध्ये ज्या वाडीत उद्यास आली त्याच वाढीतून पहिले आदिवासी ठाकूर समाज संघटनेचे नामफलकाचे अनावरण करण्यात आले.
या संघटनेचे संस्थापक रामचंद्र पादिर, अध्यक्ष रखमाजी पादिर. यांच्या नावा रूपाला संघटनेचे उगम पिंगळेवाडी येथे झाले. त्यानंतर नांलधे येथे मीटिंग लावून तत्कालीन अध्यक्ष मनोहर पाधिर यांना करून सर्व सूत्रे त्यांच्या हाती देण्यात आली.
आदिवासी ठाकूर समाज संघटनेची सभा कर्जत तालुक्यातील पिंगळेवाडी येथे पार पडली. या सभेत आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेची सुरुवात क्रांतिकारकांच्या प्रतिमेस हार अर्पण करून सभेस सुरुवात झाली. प्रथम संघटनेचे नाम फलकाचे अनावरण संघटनेचे अध्यक्ष परशुराम दरवडा यांच्या हस्ते करण्यात आले.
संघटना संभालत असताना छोटेसे वटवृक्ष रोपटे लावले होते ते आज वाढायला लागले आहे. आज पर्यंत संघटनेचे सात अध्यक्ष यांना फाउंडर मेंबर बबन शेंडे ,जोमा निरगुडा ,काशिनाथ पादिर ,गोमा दरवडा ,सोमा निरगुडा ,तालुक्यातील बुलंद आवाज म्हणून ओळख वामन ठोंबरे आतापर्यंत संघटनेचे नाव फलक कुठेही लावण्यात आले नव्हते. पिंगळेवाडी येथे नाम फलकाचे अनावरण करून आदिवासी संघटना यांचे वटवृक्ष मोठे करण्याचे काम तालुका अध्यक्ष परशुराम दरवडा, महिला अध्य क्षा जयवंती हिंदोला, नीलम ढोले , उपाध्यक्ष मंगल केवारी यांच्यावर सोपविण्यात आले. याप्रमाणे तालुक्यातील प्रत्येक गावात वाडीत आदिवासी ठाकूर समाज संघटनेचा फलक लावण्यात येणार आहे असे तालुका अध्यक्ष परशुराम दरवडा यांनी सांगितले.
मीटिंगमध्ये संघटनेने केलेल्या कामांचा आढावा मांडण्यात आला. आदिवासी समाज विवाह बाबत चर्चा करण्यात आली, युवक युवती यांनी शिक्षण घेऊन अधिकारी होण्यास व समाजाचे नाव मोठे उज्वल करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले, समाजावर होणाऱ्या अन्याया बाबत चर्चा करण्यात आली, यावेळी पांडुरंग पुजारी, सचिव भगवान भगत, मोतीराम पादिर ,गणेश पारधी, खजिनदार अर्जुन केवारी ,बालू भगत ,गणपत सांबरी, दत्तात्रय हिंदोला ,चाहू सराई ,सर्व संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच ग्रामस्थ पिंगळेवाडी समाज संघटनेच्या वतीने सर्वांचे आभार मानले गेले.


Post a Comment
0 Comments