कर्जत (प्रफुल जाधव) : दीं.१३ मार्च बुधवार : कर्जत तालुक्यातील अपंग बांधवांसाठी सरसावली ओम साई गणेश अपंग संस्था महाराष्ट्र . आज ओम साई अपंग संस्था. महाराष्ट्र यांच्या वतीने कर्जत तहसीलदार शितल रसाळ साहेब व आमदार महेंद्र थोरवे साहेब यांना निवेदन देण्यात आले.
कर्जत तालुक्यातील अपंग बांधवांना शासनाकडून पेन्शन मिळते त्या पेन्शन पासून वंचित राहावे लागत आहे. या संस्थेच्या माध्यमातून आज कर्जत खालापूर मतदार संघ आमदार श्री महेंद्र थोरवे साहेब व कर्जत तहसीलदार शीतल रसाळ यांना निवेदन देण्यात आले, दिव्यांग व विधवा महिला पेन्शन प्रकरणे ती एक वर्ष प्रलंबित ठेवली आहेत, आणि त्या पेन्शनची विचारपूस केली असता अधिकारी उडवा उडवीची उत्तर देत आहेत तसेच गैर वर्तणूक करत आहेत. उलट प्रश्न विचारतात तुला काय आवश्यकता आहे ,असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याचप्रमाणे त्यांना बँक स्टेटमेंट मागितले जाते, लाभार्थी रोजंनदार किंवा मोल मुजरी काम करत असल्यास त्याला पेन्शन नाकारली जात आहे.
ओम साई गणेश अपंग संस्था महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांनी याबाबत कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे साहेब यांच्याशी चर्चा केली यासंदर्भात सखोल चौकशी व्हावी असे पत्रक त्यांना देण्यात आले.नवीन शासन निर्णयाची कर्जत तहसील कार्यालयातील पेन्शन विभागातील कर्मचारी अंमलबजावणी करत नाहीत. अपंग लाभार्थींना आपण सहकार्य करावे. परंतु तेथे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
महाराष्ट्र शासनाने जो नवीन शासन निर्णय काढला आहे त्याची अंमलबजावणी सुद्धा केले जात नाही याचप्रमाणे कर्जत तालुक्यात अनेक लाभार्थी आहेत ते या पेन्शन पासून वंचित आहेत. असे प्रकार जर तहसील कार्यालयात होत असेल तर आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार अन्यथा आंदोलन उपोषण करू असे ओम साई गणेश अपंग संस्था अध्यक्ष यांनी म्हटले आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अमर सालोखे, सचिव पंकेश भोईर, गणेश मुंडे, लहू डायरे, समीर राऊत, रमेश भोईर , यादव धारणे दिव्यांग अध्यक्ष , मनोहर ठानगे,अन्य उपस्थित होते...


Post a Comment
0 Comments