अगामी लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. राज्याच्या बारामती लोकसभा मतदारसंघाकडे सर्वच लक्ष लावून आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये अजित पवार विरुद्ध पवार अशी लढत होण्याची चर्चा सुरू आहे. मात्र आता दोघात तिसऱ्या उमेदवाराची एन्ट्री झाली आहे. शिवसेना माजी आमदार विजय शिवतारे, यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून लढण्याचा दावा केला आहे.
त्यामुळे अजित पवार यांचे टेन्शन वाढलं आहे. मात्र आता यामध्ये आणखी एक भर पडली आहे, सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीला विरोध खडकवासला मतदारसंघातील शिवसेना विचारात घेत नसल्यास शिवसैनिक नाराज झाले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघाचा प्रचार करायचा नसून पुणे लोकसभेतील मुरलीधर मोहोळ यांचा प्रचार करूयात असा मेसेज शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक यांच्या व्हाट्सअप वर येत आहे. बारामती लोकसभेमधून अजित पवार यांना संघर्ष करायला लागणार आहे. महायुतीतील पक्ष अजित पवार यांच्यासोबत नाहीत , तसेच कुटुंब देखील अजित पवार यांच्या विरोधामध्ये आहे. यामुळे आता अजित पवारांच्या अडचणीत अधिक वाढ झाली आहे.संपूर्ण पवार कुटुंबाने साथ सोडल्यानंतर आता महायुतीतील पक्ष अजित पवार यांच्या विरोधात दिसून येत आहे.

Post a Comment
0 Comments