मुरबाड प्रतिनिधी ; मुरबाड तालुक्यातील कोरावले गावातील जंगलामध्ये जाऊन तेथील गावठी हाठभट्टी दारू अड्डा उध्वस्त व ग्रामीण भागात दारू अड्डे बंद करण्याचा मानस वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कोरावले गावाशेजारील जंगलात गावठी दारू हाठभट्टी वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाबर यांच्या मार्गदरशनाखाली उध्वस्त करण्यात आली आहे. कोरावले गावाच्या पूर्वेकडील जंगलात जाऊन गावठी दारू भट्टी धाड टाकून उध्वस्त करण्यात आली व मुद्देमाल जप्त करण्यात आले.
मुरबाड पोलिसांनी टाकलेल्या दारू गावठी हातभट्टी च्या धाडी मध्ये जवळपास २००० लिटर मापाचे १५ प्लास्टिक ड्रम,३००० हजार लिटर गावठी दारू हातभट्टी दारू तयार करण्याची वास रसायन तसेच लोखंडी ड्रम १०० लिटर मापाचे जरमन धातूचे सतेले व गावठी हातभट्टी तयार करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. सदर जप्त करण्यात आलेल्या ३००० लिटर दारूची किंमत १ लाख २० हजार रुपये इतकी आहे. या कामी पोलिस उपनिरीक्षक निंबाळकर, पी एस आय पवार, ए अस आय जुनरे. पोलिस हवालदार शिंदे, पोलिस नाईक देवरे, चव्हाण, पोलिस कॉन्स्टेबल कंते, यांच्या उपस्थितीत धाड टाकण्यात आली व अधिक तपास मुरबाड पोलिस करत आहेत....


Post a Comment
0 Comments