कर्जत.. (प्रफुल जाधव) ; कर्जत तालुक्यातील उमरोली गावातील भजन संगीत क्षेत्रात त्यांनी आपले नाव कोरले गेले ते म्हणजे श्री सचिन लक्ष्मण लोंगळे,,,
हिंद पोलीस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली महाराष्ट्र प्रदेश अंतर्गत प्रदेशाध्यक्ष श्री किशोर शितोळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ५ मार्च मंगळवार रोजी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्यातच एक कार्यक्रम , समाजकार्यात उल्लेखनीय कार्य केलेल्या समाज सेवकांना समाजभूषण पुरस्कार देण्यात आले.
कर्जत तालुक्यातील उमरोली गावातील समाज कार्य करणारे आणि आपल्या आवाजाची जादू समाजात पसरविणारे, लहानपणापासून भजनाची ओढ, आणि परिस्थितीशी झुंज देणारे अत्यंत हलाक्याची परिस्थिती तरीदेखील हार न मानणारे असे व्यक्ती महत्त्व म्हणजे उमरोली गावाचे सुपुत्र श्री सचिन लक्ष्मण लोंगले.
१९९६ पासून गावातील भजन मंडळी मध्ये जायचं, यातूनच त्यांना भजनाची आवड निर्माण झाली.१९९८ पासून गुरुवर्य श्री रामचंद्र बुवा विरले यांच्याकडे भजन संगीत पाच वर्षे शिकले ,त्यानंतर ते न थांबता असेच पुढे जाऊन त्यानंतर भजन सम्राट श्री अनंत बुवा म्हात्रे यांच्याकडे भजनाचे शिक्षण घेतले ,अनेक सिंगल भजनाचे कार्यक्रम केले तसेच जोड भजनाचे कार्यक्रम केले, घरभरणी असो, गणपती उत्सव असो ,हनुमंत जयंती ,गोपालकाला, असे अनेक कार्यक्रम निस्वार्थी पणाने समाजात केले.
समाजिक बांधिलकी जपत त्यांनी विविध प्रकारचे कॅम्प राबवून महिलांसाठी महिला सक्षमी करणाची कार्य केले, गावात पाण्याच्या समस्येपासून महिला वर्गाला मदत करून पिण्याच्या पाण्यासाठी प्रयत्न केले, गेली सात वर्ष जिल्हा परिषद शाळेचे व्यवस्थापन कमिटी चे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. गावातील अनेक तरुण मुलांचे जातीचे दाखले, आधार कार्ड, रेशनिंग कार्ड, यासाठी प्रयत्न केले. याआधीही देखील सचिन लोंगळे यांना त्यांच्या या भजनी संगीत आवडीने अनेक पुरस्कार मिळाले आहेत. परंतु या वर्षाचा २०२४ हिंद पोलीस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली ,यांच्या माध्यमातून संघटनेचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर साळोखे, प्रदेशाध्यक्ष श्री किशोर शितोळे, प्रदेश कमिटीअध्यक्ष श्री रतन लोंगले, प्रदेश ज्येष्ठ सल्लागार श्री उत्तम ठोंबरे, प्रदेश युवक अध्यक्ष श्री सुप्रेश सालोखे, यांच्या हस्ते "समाज भूषण" पुरस्कार२०२४"देण्यात आला .या पुरस्कारामुळे तालुक्यात, गावामध्ये, नातेसंबंधांमध्ये, मित्रमंडलीमध्ये सर्वत्र ठिकाणी त्यांचं कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे..

Post a Comment
0 Comments