" वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वन चरी"निसर्गाने खूप काही आपणास दाखऊन दिले आहे. बहावा फुलला की ६० दिवसांनी पाऊस पडतो,यालाच पावसाचा "नेचर इंडिकेटर "असे ही म्हटले जाते.या वर्षी हा लवकरच फुलला आहे. आता साधारण २८ मे नंतर पाऊस पडेल.
या झाडाला "शॉवर ऑफ फॉरेस्ट"असेही म्हणतात, आणि या वृक्षाचा अंदाज अचूक असतो. 'नकळत येती ओठावरती तुला पाहता शब्द वाहवा सोनवरखीले झुंबर लेऊन दिमाखात हा उभा बहावा. लोळत इवले धम्मक पिवळे दवबिंदू तून बघ लुकलुकती , हिरवी पर्णे जणू कोंदने साज पाचूचा तया चडवती. कधी दिसे नववधू बावरी हळद माखली तनु सावरते झुळुकिसंगे,, दर थरथरता डूल कानीचे जणू हालते, युवतीच्या कमनीय कटीवर झोके घेई रम्य मेखवा.की धरणीवर नक्षत्रांचा गंधर्वणी झुला बांधला. पितांबर नेसूनी युगंधर जणू झळकला या भू लोकी पुन्हा एकदा पर्थासाठी गीताई तो संगे श्लोक, ज्याज्या वेळी अवघड होई, ग्रिस्माचा तुझ दाह सहाया, त्या त्या वेळी अवतरेन मी बहावा रूपे तुज सुखवया...( प्रदेश कमिटी अध्यक्ष श्री रतन वसंत लोंगळे)

Post a Comment
0 Comments