प्रतिनिधी, कर्जत (प्रफुल जाधव) ; उल्हास नदी पात्रात बेकायदेशीर बांधकाम आणि भराव याचे काम मोठ्या वेगाने चालू आहे. याप्रकरणी तालुक्यात अनेक ठिकाणी चर्चांना उधान आले आहे. या संदर्भात भारतीय जनता पार्टी किसन मोर्चा चे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. आज यासंदर्भात प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत तहसील कार्यालयात निवेदन देऊन अनाधिकृत बांधकाम त्वरित बंद करण्यात यावे अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल असा भाजप किसान मोर्चाचे पदाधिकारी यांनी इशारा दिला आहे. कर्जत तालुक्यातील तमनाथ गावातील नदीपात्रातील सर्व नियमांचे उल्लंघन करून बेयदेशीरपणे बांधकाम व भरवायचं काम सुरू आहे. हे काम सर्वे नंबर 29 /१ . मध्ये चालू असल्याने या कामामुळे नदीचा प्रवाहाची दिशा बदलणार आहे. त्यामुळे शेतकरी व आज बाजूच्या गावांना नदीच्या पाण्याच्या पुराचा सामना करावा लागणार आहे. पावसाळ्यात पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असते, त्यामुळे पुढे जाऊन जीवित हानी व शेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण होत आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ व शेतकरी यांच्यात संतापाची लाट निर्माण झाली आहे. यासंदर्भात माहिती घेता पाटबंधारे विभाग याने हे काम अनधिकृत असल्याचे सांगून ते पूर नियंत्रण रेषेच्या सर्व नियमांचा उल्लंघन करून बांधकाम केल्याचे असे लेखी उत्तर दिले आहे.
वारंवार नोटीस पाठवून सुद्धा व सरकारी नियम व अटी आदेशांना न जुमानता काम करणाऱ्या वर कडक कारवाई झाली पाहिजे , आणि काम त्वरित बंद करण्यात यावे अन्यथा भारतीय जनता किसन मोर्चा व स्थानिक शेतकरी ग्रामस्थांच्या वतीने दिनांक 19 मार्च पासून कर्जत लोकमान्य टिळक चौकात अामरण उपोषण करणार असल्याचे तहसील दार कर्जत शितल रसाळ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे, जिल्हाध्यक्ष अतुल बडगुजर, जिल्हा सरचिटणीस जनार्दन म्हस्कर, जिल्हा उपाध्यक्ष हरिश्चंद्र मांडे, विधानसभा समन्वय विनायक पवार, मिलिंद भोईर, व गावकरी शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments