Type Here to Get Search Results !

पोलिस पाटील संघटनेकडून आमदार महेंद्र शेठ थोरवेच अभार व स्वागत...


प्रतिनिधी कर्जत ; मागील वर्षाच्या मार्च महिन्यात उपमुख्यमंत्री  मा, देवंद्रजी फडणवीस यांनी पोलिस पाटील यांच्या पगा रसंधर्भात घोषणा केली होती. सरकार पोलिस पाटील यांच्या मागण्यासंधर्भात सरकार सकरात्मक असल्याचं सांगण्यात आले, दरम्यान अनेक वर्षा पासून राज्यातील पोलिस पाटील यांच्या मानधनाची मागणी रखडली होती, ही मागणी सातत्याने कर्जत खालापूर चे कार्यसम्राट आमदार श्री महेन्द्रशेठ थोरवे यांनी देखील वारंवार केली होती. शेवटी ही मागणी पूर्ण झाली असून १५००० रू वेतन मिळणार आहे.

          या पूर्वी पोलिस पाटील यांचे मानधन केवळ ३०००रू होते, त्या नंतर फडणवीस सरकार ने ते मानधन ३०००रू वरून थेट ६,५०० रू केले होते. गाव पातळीवर पोलिसांच प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या पोलिस पटलाना आता इतर सर्व कर्मचाऱ्यांन प्रमाणे कलम ३५३ चे संरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे... कर्तव्य बजावत असताना मारहाण झाल्यास. सरकारी कामात अडथळा निर्माण झाला तर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आला, या मुळे तालुक्यातील पोलिस पाटील संघटनेकडून कार्य सम्राट आमदार श्री महेन्द्र थोरवे यांचे आभार मानले गेले..आणि त्यांना शुभेच्या देण्यात आल्या

Post a Comment

0 Comments