Type Here to Get Search Results !

प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याने सरपंच सौ प्रमिला बोराडे यांनी रायगड जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन.

 

प्रतिनिधी कर्जत ; हलीवली ग्रामपंचायत हद्दीतील हलीवली गावाच्या शेजारी गेली दोन वर्षे बोगद्याचे खोदन्याचे काम सुरू आहे, त्याच बोगद्या साठी सुरुंग स्पोट गेली वर्षभर सुरू आहेत.

         त्या मुळे हलीवली व किरवली ग्राम पंचायत हद्दीतील त्या सुरुंग मुले दोंघी ग्राम पंचायत मधील ग्रामस्थांच्या घराला तडे गेले आहेत. तर अनेक विहिरींमधील झरे बंद झाले आहेत. त्या विरोधात हलीवली ग्राम पंचायत सरपंच सौ प्रमिला बोराडे यांनी या पूर्वी दोन वेळा उपोषण केले परंतु न्याय मिळेना
       कर्जत पनवेल रेल्वे प्रकल्प किरावली व हलीवली गावाच्या हद्दीतून जात असल्याने तेथे मोठ्या प्रमाणात बोगद्याचे खोदकाम होत आहे. त्या मुळे सुरुंग स्पोट केली जातात, त्या स्पोटा मुले  घरांना तडे गेले आहेत. त्याच प्रमाणे विहिरीचे नैसर्गिक झरे बंद झाल्यामुळे भविष्यात मोठी पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बोअरवेल च्या पाण्याची पातळी खालावली आहे. या सगळ्या अडचणींना सामोरं जावं लागतं असून स्थानिक ग्रामस्थांनी सरपंच सौ प्रमिला बोराडे यांनी कर्जत यांनी १५ ऑगस्ट रोजी उपोषण केले, त्यामुळे चार दिवस साखळी उपोषण केल्यानंतर रेल्वे अधिकारी यांनी आश्वासन दिले होते. मात्र कोणतेही आश्वासन मान्य केले जात नसल्याचे निदर्शनात आले म्हणून सरपंच सौ प्रमिला बोराडे यांनी रायगड जिल्हाधिकारी याची भेट घेऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे...

Post a Comment

0 Comments