१ मे २०२४ पासून जन्मलेल्या मुलांच्या नावांमध्ये आता वडिलांच्या अगोदर आईचे नाव जोडले जाणार आहे.हा निर्णय घेतल्याबद्दल शासनाचे आभार मानायला हवेत.
जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. शासकीय सर्व महसुली तसेच शैक्षणिक व इतर सर्व कागदपत्रांवर बालकांनंतर आईचे व त्यानंतर वडिलांचे असे क्रमशः नाव लावणे बंधनकारक असणार आहे.
हा निर्णय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कालात नव्हे तर त्या अगोदर व्हायला हवा होता, आता उशिराने का होईना हा निर्णय म्हणजे संविधानाचे खऱ्या अर्थाने पालन करणारा आहे. (प्रदेश कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगले,, अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली)

Post a Comment
0 Comments