Type Here to Get Search Results !

कर्जत तालुक्यातील आदिवासी ठाकूर समाज संघटना आक्रमक, माजी समाज कल्याण सभापती यांनी दिल निवेदन.

 

कर्जत : कशेले ;(  मोतीराम पादीर )कर्जत तालुका हा ग्रामीण भाग असून तेथील नागरिकांचं मुख्य व्यवसाय म्हणजे शेती व मोलमजुरी हा आहे. त्यामुळे आदिवासी समाज मोलमजुरी कडे जास्त प्रमाणात वळलेला आहे. त्याचप्रमाणे काही भागात हा समाज शेतीसुद्धा करत आहे. बैल शेळ्या मेंढ्या म्हैस अशा प्रकारची मुुकी जनावरे पालली जात आहेत, परंतु काही महिन्यापासून मुकी जनावरे यांची चोरी होत आहे, गावातून चोरून नेली जात आहेत, काही ठिकाणी शेती करणारे बांधव याच मुख्य शेती वर अवलंबून आहेत तर त्यांच्याकडे मुख्यता गाई बैल यांची आवश्यकता आहे आणि बैलाची आवश्यकता प्रामुख्याने नांगरणी करता गरजेचे आहे आणि त्यात चोरांकडून बैलाची चोरी होत आहे. त्यामुळे आदिवासी समाजात भीतीच वातावरण निर्माण झाले आहे.

        जर बैल चोरून नेले तर शेतीची नांगरणी कशी करणार हा प्रश्न आता आदिवासी बांधवांना पडला आहे. यासंदर्भात कशेले  येथील पोलिस स्टेशन मध्ये आदिवासी बांधवांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. तरी देखील चोरीच्या घटना घडत आहेत. या घटना कशेले, शिलार, पिंगलस, खानदन, मार्गाची वाडी, बोरिवली, काठेवाडी, डामसेवाडी, ओळमन, खांडस, या विभागात मोठ्या संख्येने मुक्या जनावराच्या चोऱ्या होत आहेत. आदिवासी समाज संघटनेने कळंब व कशेले पोलिस ठाण्यात मुक्या जनावरांना चोरून नेणाऱ्या चोरांना तत्काळ अटक करून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी या संधर्भात निवेदन देण्यात आले आहे.यावेळी माजी समाज कल्याण सभापती श्री नारायण डामसे, आदिवासी समाज, संघटनेचे तालुका अध्यक्ष श्री परशुराम दरवडा, सचिव श्री भगवान भगत, उपाध्यक्ष श्री मंगल केवार, पांडुरंग पुजारी, गणपत सांबरी, काशिनाथ पादिर, अर्जुन केवार, मोहन निरगुडा, अदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments