नेरळ पोलिस ठाण्यात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल, अल्पवईन विधर्थिनीचा विनयभंग..
February 03, 2024
0
कर्जत. नेरळ...( प्रफुल जाधव); नेरळ मालेगाव येथील प्रसिद्ध कृषी पर्यटन केंद्र सगुणा बाग येथे, मुलुंड येथील विद्यालयाची दिनांक १ फेब्रुवारी रोजी शाळेची सहल आयोजित करण्यात आली होती. सकाळी ९ वाजता ही सहल सगुणा बाग येथे आली व संध्याकाळी सहा वाजता तेथून निघून गेली.मात्र ती सहल ज्या बस मध्ये आली होती त्याच बस च्या चालकाने ५ विद्यार्थी यांचा विनय भंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. या बाबत नेरळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपी चालकावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार सेवन ऑईल्स इंटरनॅशनल स्कूल मुलुंड येथील विद्यार्थिनीची १ फेब्रुवारी रोजी शाळेची सहल आयोजित करण्यात आली होती. ही सहल नेरळ मालेगाव येथील कृषी पर्यटन केंद्र सगुणा बाग येथे आली होती. सकाळी सगुणा बाग येथे पोचली आणि संध्याकाळी ६ वाजता निघून गेली. मात्र घरी गेल्यावर त्यातील ५ विद्यार्थीनींनी आपल्या पालकांना तेथील विचित्र घटना सांगितली. बस क्र.MH४३ बी पी ४२९८ या नंबरच्या बस मध्ये सहल आली असताना दुपारी या बस चा चालक अंकुश अडागळे वय १८ राहणार सातारा यांनी तर५ अल्पवईन विद्यार्थिनी सोबत चुकीचा स्पर्श केला असल्याचे; त्यांनी सांगितले, त्यामुळे पालकांनी शाळा प्रशासनकडे; या बाबत विचारणा केली त्यामुळे शाळेने याबाबत गंभीर पाऊले उचलली आणि थेट नेरळ पोलिस स्टेशन गाठले आणि शिक्षिका यांनी या बाबत फिर्याद दाखल केली. तर नेरळ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी ढवळे यांनी तक्रार दाखल होताच बस व आरोपी चालक यांना नेरळ पोलिस ठाणे येथे हजर करत आरोपीला जेल बंद केले. या बाबत नेरळ पोलिस ठाणे भादवी कलम ३५४ बालकांचे लैंगिक अत्याचार पासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८ ,१२ पॉस्को नुसार कारवाई केली आहे. तर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येऊन पुढील कारवाई नेरळ पोलिस करत आहेत." stylimageanchorstyle="margin-left: 1em; margin-right: 1em;">
Post a Comment
0 Comments