.
खालापूर...२७/सोमवार ;. खालापूर तालुक्यातील वडगांव ग्रामपंचायत हद्दीतील, बायोमेडिकल वेस्ट प्रकल्प संधर्भात, खालापूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत ने या प्रकल्पाला हद्द पार करण्यासाठी ठराव तसेच शासकीय कार्यालय पत्र व्यवहार सुरू केले आहेत,हिंद पोलिस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली, संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री किशोर शितोळे, प्रदेश कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली, खालापूर तालुका महिला अध्यक्षा सौ. वासंती शिंदे यांनी संघटनेच्या माध्यमातून खालापूर तहसील कार्यालय, रसायनी पोलिस स्टेशन, तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन सोबत ग्रामस्थ व महिलांना घेऊन हा प्रकल्प हद्द पार व्हावा या साठी निवेदन देण्यात आले आहे,
या प्रकल्पाला मुंबई उच्च न्यायालयाने व मुंबई महानगर पालिकेने गोवंडी येथून हटवण्यात आले आहे, भविष्यात याचे परिणाम खालापूर तालुक्यातील. वडगाव हद्दीतील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना, महिलांना या वेस्ट प्रकल्पा ला सामोरे जावे लागणार आहे, या मुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, त्यामुळं हा प्रकल्प हद्द पार झाला पाहिजे या साठी स्थानिक पातळीवर नागरिकांनी निवेदन देऊन हटवण्याची मागणी केली आहे..

Post a Comment
0 Comments