Type Here to Get Search Results !

संघटनेच्या माध्यमातून आदिवासी डोंगर विभागात मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर.


 कर्जत. प्रतिनिधी ( प्रफुल जाधव).; कर्जत तालुक्यातील डोंगरपट्ट्यातील आदिवासी विभागात हिंद पोलीस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली व पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया यांच्या विद्यमानाने मोफत वैद्यकीय तपासनी शालेय विद्यार्थ्यांची करण्यात आली.

                मुलांचे रक्तगट तपासणी, पोटातील जंत, भूक लागणे, वजन वाढणे, दंत चेक अप, हातापायाला खरूज झाली असेल, यासंदर्भात तपासण्या करण्यात आल्या, धनगर वाडा, चिंचवाडी, असंल वाडी, नाण्याचा माळ, सागाची वाडी, भुतेली वाडी, बोरीची वाडी, धनगर दांड, ई. भागातील शालेय मध्ये करण्यात आले

               डॉक्टर श्री. ल्याब चे डॉ. सुप्रेश सालोखे, यांच्या श्री लॅबच्या वतीने व संघटनेच्या सहकार्याने हे शिबिर योग्यरीत्या पार पडले यामध्ये कमीत कमी 1६0 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तर काही मुले उपस्थित नव्हती. यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळुंखे ,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष किशोर शितोळे, प्रदेश कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगले महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष सुप्रेश सालोखे रायगड जिल्हा युवक अध्यक्ष प्रफुल जाधव ,कर्जत तालुका युवा अध्यक्ष सुरज चव्हाण ,तालुका सेल उपाध्यक्ष गोविंद सांबरी,  विलास सांबरी, व शालेय कमिटीचे अध्यक्ष गोविंद साबरी, मुख्याध्यापक, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments