कर्जत.प्रतिनिधी; सूरज चव्हाण ; अ. पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली, या संघटनेच्या माध्यमातून कर्जत तालुक्यात अनेक ठिकाणी समाजात विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गावात, शहरात, आदिवासी भागात, संघटनेच्या माध्यमातून मोफत आरोग्य शिबीर, शालेय विद्यार्थ्यांयांना शैक्षणिक साहित्य वाटप, स्वच्छताा अभियान, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, माजी सैनिकांचा सत्कार, पोलिसांचा सत्कार, महिलांचा सन्मान, या सारखे अनेक कार्यक्रम संघटनेच्या माध्यमातून करण्यात येतात.
यातच पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली संघटनेचे तालुका सचिव कुमार प्रफुल जाधव यांनी तलागालातील अनेक सदस्यांना एकत्र आणून समाजात आपण करत असलेले समाजकार्य गावा गावात, तालुक्यात, शहरात व खेडोपाडी पोचवण्याच कार्य संघटनेच्या माध्यमातून प्रफुल जाधव यांनी केले आहे, त्याचप्रमाणे कर्जत तालुक्याच्या सचिव पदी असलेले जाधव यांनी तालुक्याच्या ठिकाणी विविध कार्यक्रम करून संघटनेच्या कार्यकर्त्यांना एकत्र आणून तालुक्यात संघटनेचे नाव मोठे केले,.
अ. पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर सालोखे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री किशोर शितोळे यांच्या मार्गदर्शनाने व प्रदेश कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगळे यांच्या सहकार्याने जाधव यांनी खूप चांगलं काम संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. त्याच त्यांच्या या कार्याची सूर्वात २०२२/२०२३ मध्ये राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या हस्ते नियुक्ती पत्रक घेऊन त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात केली. संघटनेचे महत्व. उद्दिष्टे. जाणून घेऊन आपलं समाज कार्य सुरू ठेवले, या साठी त्यांना संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला होता व या पुढे त्यांच्या समाज कार्याची दखल घेऊन २०२४ मध्ये संघटनेच्या वतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असे वक्तव्य प्रदेश कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगळे यांनी आपल्या बोलण्यातून व्यक्त केले.. आणि त्या बद्दल जाधव यांना शुभेच्या देण्यात आल्या.
.(तालुका सचिव कु. प्रफुल जाधव /संघटनेने माझ्यावर विश्वास ठेऊन,जी जबाबदारी दिली होती ती मी प्रामाणिक पने पार पाडली, कोठेही गालबोट लागू नये म्हणून काळजी घेतली, आणि राष्ट्रीय अध्यक्ष यांनी माझ्यावर विश्वास ठेऊन मला संघटनेत सामील करून घेतलं त्या बद्दल त्यांचं मी आभार मानतो. व या पुढे जाऊन असच कार्य करत राहील याची ग्वाही देतो.)
Post a Comment
0 Comments