Type Here to Get Search Results !

अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली यांच्या वतीने हॅप्पी ओल्डेज वृद्धाश्रमास भेट,,

 

पलसदरी ; कर्जत तालुक्याच्या हाकेच्या अंतरावर असलेले पल सदरी गाव,हे खोपोली व कर्जत मेन रोड वरती हॅप्पी होम वृद्धाश्रमास भेेट देऊन, तेथील वृद्ध नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या, व त्यांच्यासोबत काही क्षण घालविण्यात आला.

या वृद्धाश्रमात एकूण 50 वृद्ध ज्येष्ठ महिला व पुरुष यांचा सहभाग आहे, संघटनेच्या वतीने त्या वृद्धाश्रमास भेट देऊन त्या वृद्धांना फल ,फ्रुट, ज्यूस , बिस्कीट,मेडिसिन किट ,त्याचप्रमाणे दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली, त्याचं बरोबर काही वृध्द महिलांना ब्लँकेट देण्यात आले, पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया या संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश कमिटी अध्यक्ष यांच्या नियोजनानुसार, या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, या वेळी संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे, प्रदेश अध्यक्ष श्री किशोर शितोळे, प्रदेश सल्लागार , श्री उत्तम ठोंबरे, प्रदेश युवक अध्यक्ष सुप्रेश साळोखे,सेल अध्यक्ष श्री शांताराम मिर्कुटे, रायगड जिल्हा युवा अध्यक्ष  प्रफुल जाधव. कर्जत तालुका युवक अध्यक्ष सूरज चव्हाण,. आदी उपस्थित होते...

Post a Comment

0 Comments