Type Here to Get Search Results !

भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त जि.प.शाळा आसल वाडी शालेय विद्यार्थी यांचा सत्कार.

 

कर्जत; (गोविंद सांबरी). कर्जत तालुक्यातील माथेरानच्या पायथ्याशी वसलेले डोंगर व दुर्गम भागातील आसल ग्रामपंचायत हद्दीतील आसल वाडी. येथे, प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली व हिंद पोलिस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली,या  कर्जत तालुका कमिटी च्या पदाधिकारी यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शालेय स्पर्धेत प्रथम ,द्वितीय, तृतीय, क्रमांक मिळालेल्या विद्यार्थ्यांचा संघटनेच्या वतीने मेडल देऊन सन्मान करण्यात आला, भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आले, यावेळी प्रदेश कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगळे यांच्या हस्ते ध्वज पूजन करण्यात आले, संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर सालोखे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले., त्याचप्रमाणे शालेय कमिटी अध्यक्ष गोविंद सांबरी, मुख्याध्यापक महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष सुप्रेश साळुंखे, तालुका सचिव प्रफुल जाधव, सेल अध्यक्ष शांताराम मिरकुटे, तालुका महासचिव रुपेश कदम, युवा अध्यक्ष सुरज चव्हाण युवा महिला अध्यक्षा प्राची जाधव, सेल उपाध्यक्ष गोविंद सांबरी, विलास सांबरी,  शिक्षक व कर्जत तालुक्यातील सर्व पदाधिकारी
आणि सदस्य व ग्रामस्थ्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments