Type Here to Get Search Results !

ग्रुप ग्रामपंचायत उमरोली परिसर, अखंड हरिनाम सोहळा....

 कर्जत प्रतिनिध  ; उमरोली येथे अखंड हरिनाम सोहळ्याचं आयोजन, महिलांनी एकत्र येऊन केल परिसर स्वच्छ.

        सालाबादप्रमाणे याही वर्षी उमरोली ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील, "अखंड हरिनाम  यज्ञ सोहळा " ग्रुप ग्रामपंचाय उमरोली परिसर. स्थापना २०२२ वर्ष ३ रे या वर्षी उमरोली गावातील ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोरील मैदानात आयोजित करण्यात आले आहे.
       ग्रामपंचायत हद्दीतील, उमरोली, डिकसल, गारपोली, वावे ,कोशाने, अशाने, पाली, पोद्दार, उमरोली वाडी, पाळीवाडी, अशाने वाडी, कोशानेवाडी, ई. गावातील सर्व भाविक सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.
वै.ह.भ.प.चींदु महाराज जाधव व वै. भजन भूषण गजानन बुवा पाटील यांच्या कृपा आशीर्वादाने महाराष्ट्र भूषण गुरुवर्य ह.भ.प. मारुती महाराज राणे, यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील सर्व भाविकांच्या सहकार्याने अखंड हरिनाम यज्ञ सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
    प्रारंभ : पौष कृष्ण प्रतिपदा, शुक्रवार दिनांक २६/०१/२०२४ रोजी व समारोप ; पौष कृष्ण द्वितीया शनिवार दिनांक २७/०१/२०२४ रोजी.. यावर्षी उमरोली येथील होळीचे शेत येथे अखंड हरिनाम यज्ञ सोहळा पार पडणार असल्याने गावातील सर्व महिलांनी एकत्र येऊन सोहळ्याच्या ठिकाणाचा सर्व परिसर स्वच्छ केला जवळपास दोन तास परिश्रम करून, सोहळ्याच्या ठिकाणाचा पूर्ण कचरा गोळा करून सर्व मैदान कचरामुक्त केला आहे गावात होणाऱ्या या सोहल्यासाठी गावातील महिलांनी केलेल्या कामाचे सर्वांनी कौतुक केले आहे...
 

Post a Comment

0 Comments