कर्जत प्रतिनिधी ; कर्जत तालुक्यातील आसल ग्राम पंचायत हद्दीतील जिल्हा परिषद शाळा असलवाडी.
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आसल वाडी येथे अ. पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद. पोलीस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली यांच्या वतीने आसलवाडी जिल्हा परिषद शाळा येथे आनंदा साजरा करण्यात आला.
२६ जानेवारी हा दिवस संपूर्ण भारत देश प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला जगातील सर्वोच्च संविधान या दिवसाला सुरू करण्यात आला. आपल्या या देशात विविधता, धर्मनिरपेक्षता ,लोकशाही ,असून संपूर्ण विश्वात एक आदर्श असलेले संविधान आज या पावन दिवशी लागू करण्यात आले.
रायगड जिल्हा परिषद शाळा अस्सलवाडी येथे आज अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली, यांच्या वतीने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याचे फिल्टर देण्यात आले. सर्वप्रथम संघटनेचे महाराष्ट्र कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगले यांच्या वतीने ध्वजाचे पूजन करण्यात आले, त्यानंतर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे यांच्या हस्ते व भरत हाके मुख्यद्यपक यांनी ध्वजारोहण करण्यात आले, यावेळी शाळेतील इयत्ता पहिली ते पाचवी च्या विद्यार्थ्यांना शालेय स्पर्धांमध्ये भाग घेऊन प्रथम ,द्वितीय, तृतीय, क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून मेडल देण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री भरत दाजी हाके व सहशिक्षक योगेश शेळके यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्याचे आभार व्यक्त केले, यावेळी उपस्थित संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे, महाराष्ट्र प्रदेश कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगळे, महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष श्री सुरेश साळोखे, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष कुमार प्रफुल जाधव, तालुका महासचिव रुपेश कदम,कर्जत तालुका युवा अध्यक्ष कुमार सुरज चव्हाण, महिला युवा अध्यक्ष प्राची जाधव, तालुका सेलू उपाध्यक्ष गोविंद सांबरी , विलास सांबरी, शालेय कमिटी अध्यक्ष गोविंद जैतू सांबरी, सौ मनीषा रमेश सांबरी, सौ अलका देहू सांबरी, भास्कर कमळू सांबरी, व ग्रामस्थ पांडू तुळशीराम सांबरी, काशिनाथ सांबरी, शिवराम सांबरी, ललिता सांबरी, उपस्थित होते....


Post a Comment
0 Comments