Type Here to Get Search Results !

असंख्य महिलांच्या उपस्थितीत सोमजाई मातेचा उत्सव साजरा. माजी जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर शेठ घारे,. यांच्या वतीने...


 कर्जत प्रतिनिधी (रतन लोगळे):सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील सोमजाई मातेचा उत्सव दिनांक 23 जानेवारी रोजी कर्जत तालुक्यातील सांगवी गावात मोठ्या उत्साहात साजरा झाला.
या कार्यक्रमाचे आयोजन  जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष सुधार घारे यांनी केले, यावेळी हळदीकुंकू तसेच अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात असंख्य महिलांचा समावेश होतो, तसेच मराठी कलाकार बरोबर खेळ रागला पैठणीचा. यावेळी कर्जत खालापूर मतदार संघातून मोठ्या संख्येने महिलांचा जनसागर उसलला होता. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध बक्षिसे वाटप करण्यात आले. पहाटे सहा वाजता काकड आरती करण्यात आली व दुपारी बारा वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा तर 3:00 ते 4 वा 30 मी. हरिपाठ, त्या नंतर 7:00 पर्यंत हळदी कुंकू व पैठणीचा  तसेच रात्री नऊ ते अकरा चक्रीभजनाचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी मालिकेच्या माध्यमातून घरोघरी पोहोचलेल्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता माळी, ज्ञानदा रामतीर्थकर, सायली देवघर या मराठी कलाकारांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमांमध्ये प्रथम दहा विजेत्यांना मानाची पैठणी तसेच 25 विजेत्यांना सोन्याची नथ व कुकर देण्यात आले.
या मातेच्या उत्सवामध्ये कोंकण विभाग चे आमदार अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी युवक जिल्हा अध्यक्ष अंकित साखरे, उमाताई मुंडे, कर्जत तालुका मधीला अध्यक्ष रंजना धुळे, तालुका अध्यक्ष भगवान चंचे, रायगड जिल्हा अशोक भोपतराव, एकनाथ धुले, भगवान भोईर, मधुकर घारे, सरपंच नीलिता घारे, दीपक श्रीखंडे. कार्यकर्ते उपस्थित होते व ग्रामस्थ.

Post a Comment

0 Comments