कर्जत प्रतिनिधी (प्रफुल जाधव) ; कर्जत मध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते २७० कोटी रुपयांच्या विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन ७ जानेवारी रोजी पार पाडला. यामध्ये कर्जत शहरातील मेन प्रवेशद्वार यांस महाराष्ट्र भूषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी स्वागत कमान, उल्हास नदीकिनारी प्रति पंढरपूर ,आळंदी, ५२ फुटी विठ्ठलाची मूर्ती, छत्रपती संभाजी महाराज स्मारक , प्रशासकीय भवन, यांचे लोकार्पण सोहळा पार पडला. यासह माथेरान येथील सांडपाणी व्यवस्थापण प्रकल्प, खालापूर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय, भजन सम्राट स्व. गजानन बुवा पाटील सभागृह, कर्जत तालुक्यातील आदिवासी पाड्यात रस्त्यांांचे भूमिपूजन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते पार पाडला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या स्वागतासाठी वारकरी संप्रदायाच्या दिंडी सोहळा याप्रसंगी संपूर्ण कार्यक्रमात मुख्य आकर्षित ठरला.
कर्जत तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात १०० घाटांचे रुग्णालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, भिसेगाव येथील भुयारी मार्ग, या सर्व कर्जत मधील ऐतिहासिक कामांचे मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
यावेळी कर्जत खालापूर आमदार महिंद्र थोरवे यांनी प्रस्तावित करताना म्हणाले की समाज व्यसन मुक्त व्हावा ही तीर्थरूप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे विचार आपल्याला रुजवायला हवेत. यानंतर कर्जत पोलीस ग्राउंड येथे शिवसेना शिंदे गटाची जाहीर सभा आयोजित करण्यात आली यावेळी मंचावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, खासदार श्रीरंग बारणे, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेंद्र दळवी, सदा सरवणकर, संपर्कप्रमुख विजय पाटील, प्रमोद घोसालकर, जिल्हाध्यक्ष संतोष भोईर उपजिल्हाध्यक्ष भाई गायकर, यांसह मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments