रायगड ;(रतन लोगळे); रायगड जिल्हा पोलीस दलातील गृह विभागाचे पोलीस उपअधीक्षक संजय सावंत यांचा अपघात राजस्थानमधील जैसल मेरज जवल मृत्यू.गुरुवारी सायंकाळी ५ च्या सुमारास घडला. त्यांच्या मोटरसायकलला भरदार जिप ने धडक दिली यात तेे गंभी जखमी झाले, त्यांच्या मृत्यूमुळे रायगड पोलीस दलात शोककला पसरली आहे.
संजय सावंत यांना मोटरसायकल वरून विविध प्रांतात प्रवास करून त्या ठिकाणाचा अभ्यास करण्याचा छंद होता आणि ते एक उत्तम खेळाडू होते मोटर सायकल वरून जैसल येथून पुढील प्रवासासाठी निघाले होते.महामार्गावरून पाठीमागून येणाऱ्या भरधाव जिपणे त्यांच्या उजव्या बाजूला जोरदार धडक दिली ते गंभीरित्या जखमी झाले त्यांना रुग्णवाहिकेतून नेण्यात आले मात्र मोठ्या प्रमाणात रक्त स्त्राव झाल्याने रुग्णालयात पोहचण्या आधीच त्यांचा मृत्यू झाला.
५ जानेवारी २००१ ए पी आय पदावर पदोन्नती मिळाली, त्यानंतर मुंबई पोलीस विशेष सुरक्षा पथकात दाखल झाले नंतर राज्य पोलीस नियंत्रण कक्ष व सायबर क्राईम ब्रँच मध्ये त्यांनी अत्यंत प्रभावी कामगिरी केली त्यानंतर नाशिक येथील नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकॅडमी मध्ये बदली झाली.२०२३ मध्ये ते रायगड जिल्हा पोलीस दलात गृह विभागाचे पोलीस उपअधीक्षक पदावर रुजू झाले.३४ वर्षाच्या पोलीस सेवेत त्यांना राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध पोलीस पारितोषिके मिळाले आहेत. त्यांना अ पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली यांच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली.....

Post a Comment
0 Comments