भोकर (प्रतिनिधी); नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील विश्व लिंगायत समाजाला स्मशानभूमीसाठी जागा देऊन जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या नियोजित पुतळ्याच्या जागेवर पुतला उभारण्यात यावा व या जागेचे सुशोभीकरण करणे या मागणी साठी उपोषण करण्यात आले होते..
संघटनेचे व चळवळीचे तालुकाध्यक्ष म्हणून चंद्रकांiत स्वामी यांची ओळख यांनी तहसील कार्यालय समोर उपोषण सुरू केले त्यानंतर तहसीलदारांना निवेदन दिले भोकर शहरात मोठ्या प्रमाणात लिंगायत समाज असून स्मशानभूमीची अद्याप सोय नाही त्यामुळे समाजाची गैर सोय होत आहे उपोषणासाठी बसलेले चंद्रकांत स्वामी यांच्या मागण्या मान्य करून भोकर तहसीलदार राजेश लांडगे साहेब यांनी आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष विनोद पाटील चिंचाळकर, भोकर तालुका काँग्रेस तालुकाध्यक्ष भगवानराव दंडवे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सतीश राव देशमुख ,शिवा संघटनेचे तालुकाध्यक्ष बालाजी एलपे, बसव ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष सोहम शे ट्टे. पत्रकार उत्तमराव बावले पत्रकार विजयकुमार मोरे आदी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments