कल्याण : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने 26 जानेवारी. या दिवशी पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली या संघटनेच्या वतीने कल्याण पश्चिम खडकपाडा येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरास नागरिकांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. प्लस हॉस्पिटल यांच्या सहकार्याने, आरोग्य शिबिरामध्ये, डोळे तपासणी इसीजी ,शुगर, कोलेस्ट्रॉल, हिमोग्लोबिन, डायबेटिस व सामान्य चाचण्या डोकेदुखी ,अंगदुखी, ताप ,सर्दी, खोकला ,यांसारख्या तपासण्या करण्यात आल्या. या शिबिरास 140 नागरिकांनी आपला सहभाग नोंदविला. महिला व ज्येष्ठ नागरिक यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग या शिबिरात होता.
संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळुंखे यांच्या हस्ते सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान पुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, त्यानंतर प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन पुढील कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी प्लस हॉस्पिटल यांचे डॉक्टर अमोल चव्हाण, डॉक्टर विशाल बनसोडे सर, डॉक्टर अशोक गायकवाड सर, डॉक्टर सचिन गायकवाड, संघटनेचे प्रदेश कमिटी अध्यक्ष रतन लोंगळे, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष विशाल बनसोडे, प्रदेश युवक अध्यक्ष सुरेश साळुंखे, उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments