कर्जत रायगड ; हिंद पोलीस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली. या संघटनेच्या वतीने नवीन वर्षी नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.
संघटनेच्या माध्यमातून नागरिकांना, पोलिसांना, महिलांना व ज्येष्ठ नागरिक, यांना मदत सहकार्य केले जाते, त्यातच रायगड जिल्ह्यात चर्चेत असलेल्या या संघटनेच्या माध्यमातून तालुक्यात जिल्ह्यात, शहरात ,अनेक वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात, समाजासाठी आपण समाजसेवा कर्ण हा खूप मोठा महत्त्वाचा पैलू आहे, आपण समाजासाठी काही देणं लागतो, या उद्देशाने आपणास संघटनेच्या माध्यमातून समाजसेवा करण्यास संघटनेकडून मार्गदर्शन मिळावे, संघटनेसाठी प्रामाणिकपणे काम करेन, कुठेही गालबोट लागणार नाही याची जबाबदारी घेऊन सर्वांना एकत्रितपणे घेऊन संघटनेचे महत्त्व जाणून कार्य करेल असे विधान नवनियुक्त रायगड जिल्हा युवक अध्यक्ष कुमार प्रफुल जाधव यांनी केले. संघटनेच्या प्रदेश कमिटी अध्यक्षश्री रतन लोंगळे, यांनी मार्गदर्शन केले, यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळुंखे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री किशोर शितोळे, महाराष्ट्र कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगले, महाराष्ट्र युवा अध्यक्ष श्री सुप्रेश साळोखे, कर्जत तालुका युवा अध्यक्ष कु. सुरज चव्हाण, महिला युवा अध्यक्ष प्राची जाधव, यांच्या हस्ते कु . प्रफुल मनोहर जाधव यांची रायगड जिल्हा युवक अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली, आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment
0 Comments