Type Here to Get Search Results !

मराठ्यांच्या लढ्याला मोठं यश, मध्यरात्री तीन तासांच्या बैठकीनंतर मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य.

 

वाशी नवी मुंबई ; गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा समाजाच घोंगड भिजत पडलं होतं . सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल असताना राज्य पातळीवरही हेे टिकणार आरक्षणर देण्याकरिता सरकार प्रयत्न करीत आहेत. अखेर मनोज जरांगे पाटलांच्या लढ्याला मोठ यश मिळालं आहे.

मध्यरात्री तब्बल तीन तास चर्चा झाल्यानंतर सरकारने मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांचा सुधारित अध्यादेश जारी करून त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत या संदर्भात मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. येत्या काही वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी मधून मुंबईच्या दिशेने निघाले होते, परंतु त्यांचं हे आंदोलन रोखण्याचा प्रचंड प्रयत्न करण्यात आला, दरम्यान मनोज जरांगे पाटलांनी काळ २६ जानेवारी रोजी वाशीत भव्य सभा घेतली, त्याआधी सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांच्याबरोबर संवाद साधला होता. या चर्चेत ही अंतिम तोडगा न निघाल्याने मनोज जरांगे पाटलांनी आजच्या दिवसाचा अल्टिमेटम दिला होता, त्यामुळे आरक्षण मिळालं तर गुलाल घेऊन येऊ अन्यथा आंदोलनासाठी मुंबईच्या दिशेने कुच करू असा इशारा त्यांनी दिला. या इशाऱ्यानंतर सरकार पुन्हा कामाला लागलं सरकारच्या शिष्टमंडलने पुन्हा एकदा जरांगेंच्या शिष्टमंडळाबरोबर  चर्चा केली आणि मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य केल्या.


       महत्त्वाचं म्हणजे सगळ्या मागण्यान बाबत मनोज जरांगे नी शासन निर्णय आणि लिखित पत्रे घेतले आहे. मराठा समाजाच्या 54 लाख नोंदी सापडल्या आहेत, सापडलेल्या नोंदणीचं प्रमाणपत्र देण्यात याव, असा आपला लढा होता, ज्यांची नोंद सापडली त्यांच्या सगासोयऱ्यांनाही प्रमाणपत्र देण्या करता अध्यादेश पारित करण्यात आला आहे. मराठा समाजाच्या मूल मागण्या पूर्ण झाल्या आहेत. या अध्यादेशावर राजपत्र काढलं आहे. यावर तीन तास चर्चा झाली मुंबई हायकोर्ट च्या वरिष्ठ वकिलांनी शब्दांन शब्द वाचून खात्री केली आहे, त्यानंतर जरांगे पाटील बाहेर पडले, त्यामुळे समाज म्हणून आता आपला विरोध संपला, समाज म्हणून काम करत असताना आम्ही कोणत्याही पक्षाला सोडलं नाही आता आपला लढा संपला आहे त्यामुळे समाज म्हणून आपला विरोध आणि विषय संपला आहे असे जरांगे म्हणाले. विजयाचा गुलाल उधळण्या करता मनोज जरांगे पाटील मुंबईला जाणार होते. परंतु आता ते मुंबई जाणार नसल्याचा त्यांनी जाहीर केले आहे,

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उपोषण सोडून ते आंतरवाली सराटीच्या दिशेने निघणार आहेत व अंतरवाली सराटी येथे मोठी विजयाची सभा घेण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments