कर्जत प्रतिनिधी ( प्रफुल जाधव); हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ने. कर्जत खालापूर विधानसभा आमदार माननीय महेंद्र शेठ थोरवे फाउंडेशन व रोटरी क्लब बॉम्बे यांच्या वतीने महाआरोग्यय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
महाआरोग्य शिबिराचे आयोजन शिवतीर्थ हॉल पोसरी येथे करण्यात आले, आमदार महेंद्र थोरवे यांनी पद्मश्री डॉक्टर तात्या राव लहाने, किशोर जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत या आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी निराधार महिलांना शिलाई मशीन व अपंगांना व्हीलचेअर याच वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या महा आरोग्य शिबिरात 2000 पेक्षा जास्त नागरिकांनी सहभाग नोंदविला आहे. या आरोग्य शिबिरामध्ये नेत्र तपासणी, मोतीबिंदू, इसीजी, बीपी, शुगर, व सामान्य चाचण्या करण्यात आल्या, पाठ दुखी, हाडांच्या आजार, मान दुखी ,हाता पायाला मुंग्या येणे, स्त्री रोग ,दंत रोग, कॅन्सर ,तोंडाचा कर्करोग, गर्भाशयाच्या समस्या, मधुमेह, आधी आजारांवरती उपचार करण्यात आले. त्याचप्रमाणे चष्मे वाटप करण्यात आले. माननीय आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या या महाआरोग्य शिबिरा मध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व सर्वत्र ठिकाणी आमदारांच कौतुक केलं जातं आहे....

Post a Comment
0 Comments