Type Here to Get Search Results !

अयोध्येत प्रभू श्री राम विराजमान. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते श्री रामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना..

 

अयोध्या; २२ जानेवारी,अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या भव्य मंदिराचे आज मोठ्या उत्साहात लोकार्पण सोहळा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली, दुपारी 12 वा 30 मी. हा सोहळा पार पडला.

यावेळी जय श्री रामाच्या घोषणांनी अयोध्या नगरी दुमदुमली, रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. यावेळी हेलिकॉप्टर मधून राम मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. आपल्या लाडक्या दैवताचा हा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा अवघ्या देशाने डोले भरून पाहिला. या सोहळ्यात कोट्यवधी रामभक्त यांचा उर अभिमानाने भरून आला होता.           

          प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करताना स्वतः मोदी ही मंत्राचे पठण करत होते, मंत्रोच्चार आणि शंख नाद सुरू असताना पंतप्रधान मोदी अत्यंत भाऊक झाले होते. दरम्यान भगवान श्रीराम यांच्या मूर्तीची पहिली झलक पाहिल्यावर रामभक्तांच्या भावना अनावर झाल्या होत्या."याची देही डोला ऐसा देखिला सोहळा"अशा भावना रामभक्तांनी व्यक्त केल्या.
          प्राणप्रतिष्ठे वेली पंतप्रधान मोदी यांच्या गर्भ ग्रहात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ. सरसंघचालक मोहन भागवत. राज्यपाल आनंदी बेन पटेल, राम जन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपालदास उपस्थित होते. 
      आज दिवसभरात सोहळा सुरू असल्यामुळे देशभरातील राम भक्तांना प्रसाद वाटप करून 24 जानेवारी पासून राम मंदिर सर्व काम भक्तांना खुले करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments