कर्जत कशेले ; कर्जत तालुक्यातील धोत्रे वाडी आदिवासी विभाग असल्याने तालुक्याच्या एका टोकाला पाथरज ग्रामपंचायत हद्दीतील धोत्रे गाव व धोत्रे वाडी यासाठी शासनाकडून 81 लाख रुपयाची जल जीवन मिशन योजनेच्या माध्यमातून पाणी योजना मंजूर झाली होती कर्जत तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो.
साधारण हा भाग डोंगर व दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. जल मिशन योजनेचे पाणी धोत्रे गावात योजनेचे पाणी पोचले मात्र धोत्रेवाडीत वर्षभरात केवल दोनच वेळा पाणी मिळाले त्यामुळे ग्रामस्थ आता आक्रमक झाले आहेत.
धोत्रे वाडीतील आम्हा बायकांना पाण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. गावात चार विहिरी असून यापैकी एक गावाजवळ असून ती मालकीची आहे आणि या विहिरीवर आम्ही पाणी भरतो. परंतु फेब्रुवारीच्या मधल्या काळात या विहिरीचे पाणी आटले जाते त्यासाठी पाण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. त्यामुळे महिलांना खूप त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे "बाई पण नको "म्हणण्या ची आमच्यावर वेळ आली आहे. पण शासनाला याचा सोयर सुतक नाही असे उद्गार ग्रामस्थ सखुबाई अगवले यांनी काढले.
शासनाने या गावासाठी तब्बल 81 लाख रुपये खर्चून पाणी योजना केली त्याचे पाणी धोत्रे गावाला जात मात्र आम्हाला येतच नाही असे का ? आम्ही देखील तिथेच राहतो आजवर आम्हाला केवल दोन वेळा या योजनेतून पाणी मिळालं त्या मुले ही योजना नावालाच आहे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या शासकीय योजनेचा आदिवासींना उपयोग काय ? असे ग्रामस्थ धर्मा भगत यांनी सांगितले आहे, साधारण तीनशेच्या वर लोकसंख्या असलेली वाडीत एकूण चार विहिरी आहेत यापैकी दोन विहिरी मालकीच्या. पण या विहिरीची पाण्याची पातळी खालवली असून केवल पुढचा महिना पुरेल एवढे पाणीसाठा जमा आहे. उन्हाळ्यात महिलांना पाण्यासाठी विहिरीवर रात्र काढावी लागते, यंदा योजनेचे पाणी येईल म्हणून या समस्येतून मार्ग निघाला असल्याने ग्रामस्थ महिलांनी सुटकेचा श्वास घेतला मात्र प्रशासनाच्या व ठेकेदाराच्या भोंगल कारभारामुळे याचा फटका ग्रामस्थांना बसला आहे.


Post a Comment
0 Comments