कर्जत प्रतिनिधी (रतन लोंगले); कर्जत तालुक्यातील हुतात्मा हिराजी पाटील यांची दिनांक १९ जानेवारी रोजी जयंती असल्याने आगरी समाज संघटने कडून ही जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
हुतात्मा हिराजी पाटील यांना अभिवादन करण्यात आले ,याप्रसंगी आगरी समाज संघटना कर्जत तालुका यांच्याकडून माजी सरपंच, माजी जिल्हा परिषद सदस्य, शिवसेना पक्षप्रदत अशी अनेक पदे भूषविलेले श्री सावळाराम जाधव यांना समाज भूषण पुरस्कार देत त्यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी धामोते येथील हुतात्मा हिराजी पाटील सामाजिक सभागृहाच्या प्रांगण शेड व सभागृह परिसरात सुशोभीकरण करण्यात आले, त्याचे उद्घाटन पनवेलच्या आमदार प्रशांत ठाकूर व माधवी जोशी प्रतिष्ठान च्या अध्यक्षा सौ माधवी जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावरती आमदार प्रशांत ठाकूर, आगरी समाज संघटना तालुकाध्यक्ष सुरेश टोकरे, इतिहास संशोधक वसंत कोलंबे, माधवीताई जोशी, सरपंच महेश विरले, आगरी समाज संघटना माजी अध्यक्ष व माजी सभापती सभापती एकनाथ धुळे, सावळाराम जाधव, अरविंद पाटील, भाजप तालुकाध्यक्ष राजेश भगत, जिल्हा चिटणीस मंगेश मस्कर, यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments