नांदेड.(मुखेड). जिल्हा अध्यक्ष यांनी दिले निवेदन.
नांदेड ; मुखेड तालुक्यातील रोहीपिंपळगाव येथील सहा वर्षाच्या चिमुकलीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली, राज्यात तीव्र संतापाची लाट पसरली आहे, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी म्हणून अ.पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली, राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. किशोर शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्याचे संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्री प्रकाश कोद्रे. यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नांदेड यांना निवेदन देण्यात आले.
सहा वर्षीय प्रिया निरंजन शिंदे या चिमुकलीची निर्घृणपणे हत्या करून रस्त्याच्या बाजूला मृतदेह फेकण्यात आले.
१४/०१/२०२४ रोजी, दुपारी २ वाजे पासून ती चिमुकली दिसत नव्हती, त्यामुळे नातेवाईक व गावकऱ्यांनी तिची सगळीकडे शोधाशोध केली,रात्री उशिरा मुदखेड पोलिस स्टेशन ला जाऊन तक्रार देण्यात आली, हत्या करणारा आरोपी येवडा क्रूर व निर्दयी होता की त्यांनी चिमुकलीवर अत्याचार करून माणुसकीला कालीमा फसला आहे.
या घटनेमुळे रोही पिंपळगावासह संपूर्ण नांदेड जिल्ह्यात सर्वत्र हलहल व्यक्त होत निष्पाप चिमुकलीच्या मारेकरांना तत्काल अटक करून आरोपींना कठोर शासन झाले पाहिजे. या साठी संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष प्रकाश कोड्रे, जिल्हा कार्याध्यक्ष भरत राठोड, बालाजी यळमरवाड, तालुका सल्लागार संदीप सोनटक्के, महिला वंदना गव्हाणे , शोभा वाघमारे, यांच्या वतीने निवेदन देण्यात आले..

Post a Comment
0 Comments