Type Here to Get Search Results !

रायगड जिल्हा परिषद शाळा वावे येथे नवीन वर्षात स्त्युत्य उपक्रम करण्यात आला.


कर्जत प्रतिनिधी (सूरज चव्हाण): उमरोली ग्रुप ग्रामपंमचायत हद्दीतील रायगड जिल्हा परिषद शाळा वावे, येथे अ. पोलीस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद पोलीस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली, यांच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. 

मुलांना व मुख्याध्यापक राऊत मॅडम यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन मुलांना वह्या ,इंग्लिश स्पिकिंग पुस्तक ,सस्पेन्सिल ,पेन ,खोर रबर ,शॉपनर ,बिस्किट ,तसेच खेळताना कुठे खर्चटल त्याकरता मेडिसिन किट देण्यात आले. मुलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले नवीनच वर्षी मुलांसाठी शालेय साहित्य वाटप करण्यात आले, यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळुंखे, प्रदेश कमिटी अध्यक्ष रतन लोंगले, जिल्हा सदस्य सुभाष ठाणगे ,तालुका सचिव प्रफुल जाधव, युवा अध्यक्ष सूरज चव्हाण, महिलायुवा अध्यक्षा प्राची जाधव, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments