कर्जत प्रतिनिधी (प्रफुल जाधव): पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब 12 जानेवारी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत, दुपारी १२:२० मी. नाशिक येथे आगमन होणार असून, तेथे 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करणार त्यानंतर दुपारी साडेतीन च्या सुमारास मुंबई येथे अतल बिहारी वाजपेयी शिवडी सेवा अटल शेतूचेे उद्घाट करणार. तसेच नवी मुंबई येथे दुपारी चार वाजून वीस मिनिटांनी पंतप्रधान साहेब विविध विकास कामांचे उद्घाटन करणार आहेत.
शहरी पायाभूत सुविधा व वाहतूक सुविधा बळकट करून सुलभ गतीला चालना देणे हे मुख्य हेतू, अटल सेतू एकूण 17,840 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्च करून बांधण्यात आला आहे सुमारे 21.8 किमी लांबीचा सहा पदरी हा पूल असून, समुद्रावर तो सुमारे 16.5 किमी लांबीचा तर जमिनीवर 5.5 किमी लांबीचा आहे, भारतातील सर्वात लांबीचा पूल व देशातील सर्वात लांब सागरी पूल आहे, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला यामुळे वेगवान कनेक्टिव्हिटी प्राप्त होणार आहे, मुंबई पुणे गोवा या प्रवासाच्या वेळेत बचत होणार पूर्ण पूर्ण मुक्त मार्गाचे ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह ला जोड नाऱ्या भूमिगत रस्ता बोगद्याचे पंतप्रधान यावेळी पायाभरणी करणार आहेत.9.2 किमी लांबीचा बोगदा 8700 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्च करून बांधला जाईल. पंतप्रधान सुमारे दोन हजार कोटी रुपये रेल्वे प्रकल्प राष्ट्राला समर्पित करणार आहेत. उरण ,खारकोपर, नेरूळ बेलापूर ते खारकोपर, ठाणे वाशी पनवेल, ट्रान्स हर्बल दिवा गाव, खारोड आणि गोरेगाव रेल्वे स्थानका दरम्यान नवीन सहाव्या रेल्वेचा समावेश आहे, या प्रकल्पामुळे मुंबईतील हजारो नागरिका ंना याचा फायदा होणार आहे.,

Post a Comment
0 Comments