कर्जत प्रतिनिधी (प्रफुल जाधव); नेरूळ पोलीस ठाणे हद्दीतील नेरल खांडा विठ्ठल रखुमाई मंदिर शेजारील दोन मजली घराच्या चालीत राहणारे महेंद्र दुबे यांच्या घरी 11 जानेवारी रोजी चोरी झाली घरातील सर्व सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम एक लाख रुपये चोरणे चोरली. साधारणपणे दहा लाख रुपये चा ऐवज असल्याने प्रथम घरमालक दुबे यांनी नेरळ पोलीस स्टेशन कडे धाव घेतली. सर्व माहिती पोलीस स्टेशनमध्ये मांडली. आपल्या आयुष्यभराची पुंजी असून लवकरात लवकर चोराला पकडून आपल्याला न्याय मिळावा म्हणून पोलिसांना आपली व्यथा मांडली.
नेरळ पोलीस यांनी नेरळ खांडा येथील संशयित अविनाश राठोड या तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले, सुरुवातीला आपण चोरी केली नसल्याची बतावणी केली परंतु पोलिसांना त्याच्या बोलण्याचा संशय आला होता. त्यानंतर पोलिसांनी आपली खाकी दाखवताच चोरीची कबुली दिल्यानंतर या तरुणाला ताब्यात घेण्यात आले.
नेरळ पोलिसांच्या या कामगिरीमुळे नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री शिवाजी ढवळे व त्यांच्या पूर्ण पोलीस टीमचे सर्व विभागातून कौतुक होत आहे

Post a Comment
0 Comments