Type Here to Get Search Results !

राज्यात तीन दिवस थंडीच्या तीव्र लेाटेचा इशारा.....

    


    महाराष्ट्र गारठला राज्यात तीन दिवस थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा; तापमानात मोठी घसरण .

      नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन

   *कर्जतची खान*      राज्यातील हवामान अचानक थंड झाले असून, पुढील तीन दिवस 9, 10 आणि 11 डिसेंबर महाराष्ट्रात कडाक्याच्या थंडीची तीव्र लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 7 अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाण्याचा अंदाज असून नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


    राज्यात गेल्या दोन दिवसांपासून तापमानात मोठे बदल दिसू लागले आहेत. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात प्रवेश करताच काही भागांत थंडी वाढली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, कोकणसह काही भागात सकाळ-सायंकाळ गारवा कायम राहणार आहे, तर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीची तीव्र लाट जाणवेल. मंगळवारच्या तुलनेत अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा घसरला आहे. पुणे जिल्ह्यात आज सकाळी तीव्र थंडी जाणवली आहे. हवामान विभागाने पुण्यासाठी यलो अलर्ट जारी केला असून तापमानात कोल्ड वेव्हसदृश स्थिती आहे.


    उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात देखील थंडीची लाट निर्माण झाली आहे. धुळे, नंदूरबार, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर या जिल्ह्यांत पुढील दोन दिवस थंडीची लाट राहील. तर सोलापूरसह मराठवाड्यातील छ. संभाजीनगर, जालना, बीड, परभणी या जिल्ह्यांना देखील ‘कोल्ड वेव्ह’चा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील 48 तास धोक्याचे असून नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल. अनेक जिल्ह्यांचा पारा 10 अंश सेल्सिअस नोंदवला गेला. त्यामध्येच पुढील काही दिवसांमध्ये थंडी अधिक वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. सतत हवामानात बदल होताना दिसत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्याही निर्माण झाल्या आहेत.

Post a Comment

0 Comments