कर्जातची खान /प्रतिनिधी ; दि.२८ सप्टेंबर रोजी ठीक १०:३० ते सायंकाळी ५ वाजे पर्यंत ठाणे जिल्ह्यात महात्मा फुले नागर सचिन तेंडुलकर मैदान येथे आयोजित केले होते.
नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने ठाणे येथे महाआरोग्य व महा रक्तदान शिबिराचे आयोजन संघटनेच्या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित पार पडले. या शिबिरात अनेक राजकीय व सामान्य नागरिकांनी ,महिलांनी ,ज्येष्ठांनी तसेच शालेय विद्यार्थ्यांनी सुद्धा सहभाग घेतला.
हे शिबिर कोणत्याही राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आलेले नव्हते. संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात शिबिराच्या आयोजन प्रत्येक जिल्ह्याचे पदाधिकारी करत असतात . अशातच ठाणे जिल्ह्यात हे संघटनेच्या वतीने ५ वे महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात सामान्य आजारावरती उपचार ताप, सर्दी, खोकले, घसा, कान. त्याचप्रमाणे डोळे तपासणी, कोलेस्ट्रॉल, इसीजी, बीपी ,शुगर, संधिवात, भगेन्द्र, गुडघेदुखी, फुफुसाचे आजार, पिस्तुला, शालेय विद्यार्थ्यांसाठी रक्तगट तपासणी व रक्तदान शिबिर आणि डॉक्टरांचे मार्गदर्शन.
या शिबिरात अखंड पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद .(आरक्षि) पोलीस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर सालोखे. महाराष्ट्र प्रदेश कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगले. ठाणे जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर विशाल बनसोडे, रायगड जिल्हा सदस्य संतोष पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विभाग अध्यक्ष समीर शेळके, अधिक प्रमुख मान्यवर उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments