कर्जत प्रतिनिधी/ कर्जतची खान ; संतोष पवार : *अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषदेच्या तालुका संघटक संतोष थोरवे यांचा वाढदिवस जिल्हा परिषदेच्या सावरगाव शाळेत संपन्न*
वार बुधवार दि.०१/१०/ 2025 रोजी दुपारी ११:३० मी. रायगड जिल्हा परिषद शाळा सावरगाव येथे अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद (आरक्षि) पोलिस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली संघटनेचे कर्जत तालुका सह संघटक श्री.संतोष थोरवे यांचा वाढदिवस संघटनेच्या पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडला.
कर्जत खालापूर तालुक्यात दरवर्षी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने नवीन नवीन उपक्रम राबवत असतात.
समाज सेवेचा वसा घेऊन आपले समाज कार्य संघटनेच्या माध्यमातून तालुक्यात आणि गावा गावात वस्तीत, पोचवत आहेत. .
काही लोक आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताे हाजारो रुपये खर्च करून साजरा करत असतात. परंतु थोरवे यांनी आपला या समाज कार्याचा डंका कर्जत तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा सावरगाव येथील लहान मुलांच्या सोबत वाढदिवस साजरा करून मुलांना जेवण आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
त्याचप्रमाणे चेडोबा देवस्थान लगत असलेल्या आदिवासी वाडीतील मुलांना देखील शैक्षणिक साहित्य आणि जेवण देण्यात आले.
यावेळी संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी ग्रामस्थ श्री अशोक थोरवे चेडोबा देवस्थान सचिव, हभप महाराज वासुदेव बेडेकर, कर्जत प्रभात संपादक श्री जयेश जाधव,श्री देवराम साळोखे, गजानन साळोखे, शाशीकांत साळोखे, ॲड रुपेश कांबरी,गौरव कांबरी, चंद्रकांत कर्णुक, सचिन कर्णुक, योगेश विर्ले, सौ, सोनाली संतोष थोरवे, सर्व परिवार नातेवाईक शाळेचे मुख्याध्याप कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments