*कर्जत पोलिसांंनी वाहन चोराच्या आवळल्या मुसक्या*
कर्जत पोलिसांची राज्यास्थान पार्यंत यशस्वी कारवाई
कर्जत, 4 सप्टेंबर / कर्जत पोलिसांनी एक कौतुकास्पद आणि धाडसी कारवाई करत सुमारे दहा लाख रुपये किमतीची टोयोटा इनोव्हा क्रिस्टा कार जप्त केली असून, या प्रकरणात राजस्थानातील दोन कुख्यात सराईत आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ही कार सद्दाम अश्फाक मिस्त्री यांच्या छत्रपती संभाजी महाराज चौकातील स्पेअर पार्ट शोरूमच्या शेजारी पार्क करण्यात आली होती. दि. 4 जून 2025 रोजी (इमेज 46 बीएफ 2025 क्रमांकाची) ही कार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गु.र.क्र. 215/2025 नोंद करण्यात आली होती.
तांत्रिक तपास आणि राजस्थानमधील कारवाई ; पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची दिशा निश्चित करत, पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अभिजित शिवथरे अप्पर पोलीस अधीक्षक, पोलीस उप विभागीय अधिकारी राहुल गायकवाड व पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हवालदार संतोष खाडे, स्वप्नील येरुणकर, प्रवीण भालेराव, सुशांत वरक, सागर शेवते आणि विठ्ठल गावस यांच्या पथकाने राजस्थानमधील वाडनेर व जालोर जिल्ह्यांमध्ये धडक कारवाई केली.
या कारवाईत ओमप्रकाश सवाईराम विंचोई आणि अशोक कुमार ईसराराम बिनशोई या दोन सराईत आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून फिर्यादीची चोरी गेलेली इनोव्हा क्रिस्टा आणि गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली स्विफ्ट डिझायर (HR 12 6493) जप्त करण्यात आली आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमी गंभीर; अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी हे अतिशय कुख्यात आणि गुन्हेगारी जगतातील सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर राजस्थान राज्यात एकूण 17 गंभीर गुन्ह्यांचे (खूनाचा प्रयत्न, चोरी, फसवणूक, बनावट कागदपत्रे, खंडणी, बलात्कार, गंभीर दुखापट, हत्यार कायदा आणि अंमली पदार्थ विरोधी कायदा) अंतर्गत गुन्हे दाखल आहेत कर्जत पोलिसांे पाथकाे केलेल्या कारवाई प्रकारणी पोलिसांच सर्व स्तरावर कोौतुक केले जात आहे.

Post a Comment
0 Comments